मनसेच्या गोटात खळबळ, नवी मुंबईत गजानन काळेंवर गुन्हा दाखल विकास मिरगणे
मुंबई/पुणे

मनसेच्या गोटात खळबळ, नवी मुंबईत गजानन काळेंवर गुन्हा दाखल

पत्नीच्या तक्रारीवरून काळे विरोधात एफआयआर दाखल

विकास मिरगणे

नवी मुंबई - मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे Gajanan Kale यांच्यावर त्यांच्याच बायकोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळ करणे, शिवीगाळ करणे आदी कलमांखाली नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईत Navi Mumbai आणि मनसेच्या MNS गोटात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेरूळ पोलीस स्टेशनमध्य Nerul Police Station काळे यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी काळे विरोधात एफआयआर दाखल केला आहे. गजानन काळे गेल्या काही वर्षांपासून आपल्याला मारहाण करीतअसून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा एफआयआर मध्ये उल्लेख आहे.

हे देखील पहा -

बाहेरील महिलांशी गजानन काळे यांचे संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय होत असल्याचे देखील या एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच २००८ मध्ये आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या 15 दिवसांनी गजानन माझासोबत किरकोळ कारणावरून भांडण करू लागला, शिवीगाळ करू लागला.

तो मला माझ्या सावळ्या रंगावरून टोमणे मारायचा तू सावळी आहे, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले असे बोलून दाखवायचा. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही. एकदा गजानन याने मला मारहाण केली होती असंही त्यांच्या पत्नीने एफआयआरमध्ये सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT