Raju Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Raju Patil: मनसे 99 चा आकडा गाठणार, राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करताच राजू पाटील यांचा कॉन्फिडन्स वाढला!

Maharashtra Assembly Election 2024: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज राजू पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच राजू पाटील यांचा कॉन्फिडन्स वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

Saam Tv

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

''यंदाच्या निवडणुकीत मनसेचे दोन आकडी आमदार निवडून येतील ते 99 पण असू शकतील, असा दावा मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. डोंबिवलीत राजू पाटील यांच्या कार्यलयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. आजच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजू पाटील यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे.

यावेळी भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी उमेदवारांची दुसरी यादी उद्या जाहीर होईल, असे सांगितले. त्यानंतर कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील व ठाण्याहून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. राजू पाटील यांना अचानक उमेदवारी जाहीर होणार, याबाबत माहिती नव्हती. मात्र राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील व ठाण्याहून अविनाश जाधव यांचे उमेदवारी जाहीर केल्याने त्यांचे आभार मानले.

राजू पाटील म्हणाले आहेत की, लोकांना नवनवीन योजना दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र लोकं आधीचे राजकरण विसरले नाहीत. त्यांना बदल हवा आहे, त्याप्रमाणे ते राज ठाकरेंकडे पाहून आम्हाला मतदान करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवतीर्थ येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. तसेच मुंबईतील विभागाध्यक्षांसोबत देखील चर्चा केली. मनसे नेते आणि राज ठाकरे यांनी आज इतर पक्षातील इच्छुक, नाराज उमेदवारांची ही चाचपणी केली आहे. मनसे उद्या दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT