MMRDA Marathon Saam Digital
मुंबई/पुणे

MMRDA Marathon : अटल सेतूवर उद्या MMRDA तर्फे मॅरेथॉन, या वेळेत राहणार प्रवेशबंदी? कसं असेल वाहतुकीचं नियोजन? जाणून घ्या

Marathon on Atal Setu : अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून मुंबईकरांचं मुख्य आकर्षणाचं केंद्र राहिलेला आहे. दरम्यान एमएमआरडीए तर्फे उद्या अटल सेतूवर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

Atal Setu Mumbai

अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून मुंबईकरांचं मुख्य आकर्षणाचं केंद्र राहिलेला आहे. दरम्यान एमएमआरडीए तर्फे उद्या अटल सेतूवर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज रात्री 11 ते उद्या दुपारी 1 वाजे पर्यंत अटल सेतू वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने सायन पनवेल महामार्गाने वळवण्यात आली आहेत. तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही सायन पनवेल महामार्गाने वळविण्यात आली आहेत.

मुंबईतील या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. त्यामुले अटल सेतूवरून शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण १० तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

यामध्ये अत्यावश्यक वाहनांना सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करू, अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या सागरी सेतूवरुन दिवसाला ७० हजार वाहने धावतील असा, दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला होता. मात्र महिन्याभरात या सागरी सेतूवरुन ८ लाख १३ हजार ७७४ वाहने धावली असून दिवसाला सरासरी २७ हजार वाहने धावत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT