MLA Geet Jain
MLA Geet Jain saam tv
मुंबई/पुणे

कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करा; महाराष्ट्रातील आमदाराचे राष्ट्रपतींना पत्र

चेतन इंगळे

मीरा भाईंदर : माझ्या कुटुंबाच्या संपत्तीची केंद्रातील सर्व तपास यंत्रणांकडून चौकशी करा अशी मागणी मीरा भाईंदर शहराच्या आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना पत्र पाठविले आहे. दरम्यान गीता जैन यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. समाज माध्यमातून (social media) टीका करणा-यांसह विरोधकांना जैन यांनी उचललेल्या पावलामुळे चांगलीच चपराक बसली आहे. (geeta jain latest marathi news)

ज्या राज्यात भाजप (bjp) सरकार नाही तेथे सध्या मोठ्या प्रमाणात केंद्रीय यंत्रणा धाडी टाकत आहेत. त्यातच महाराष्ट्रात (maharashtra) धाडी टाकण्याचे प्रमाण जास्त आहे. सेना (shivsena), काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीच्या (ncp) नेत्याच्या घरी व कुटुंबातील सदस्य यांच्यावर सीबीआय, आयकर विभाग, ईडी सारख्या तपास यंत्रणा छापेमारी करत आहेत.

आमदार गीता जैन यांच्याबाबत समाज माध्यमातून सध्या टीका टिप्पणी सुरु आहे. जैन या अपक्ष निवडून आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला (shivsena) समर्थन दिले. त्यातच शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या घरी छापेमारी सुरू असताना मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी स्वतःच्याच कुटूंबाची संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करा अशी मागणी करीत जणू केंद्र सरकारला खुले आव्हानच दिले आहे. जैन यांच्या या पवित्र्याची शहारत चर्चा सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

Today's Marathi News Live: विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT