Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune News: तरुणीवर ब्लॅकमेल करत तब्बल आठ वर्ष अत्याचार; पीडितेने हिंमत दाखवत उचललं मोठं पाऊल

पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : पुण्यात एका तरुणीवर लग्नाचे आमीष दाखवत मागील आठ वर्षांपासून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडित तरुणीला ब्लॅकमेल केले. पीडित तरुणीने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली, त्यावरुन चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या माध्यमातून तरुणाने तरुणीला अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार २०१४ ते २०२२ दरम्यान बेंगलोर,गुडगाव,नवी दिल्ली, जयपूर,पुणे आदी ठिकाणी घडलेला आहे. या प्रकरणी पीडित २२ वर्षीय तरुणीने आरोपी देबारशी नायक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Crime News)

आरोपी देबाराशी नायक विरोधात चतुर्श्रुंगी पोलिसांत बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून पीडिता 14 वर्षाची अल्पवयीन असताना तिच्याशी ओळख केली. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले.

अशाप्रकारे आरोपीने अनेकदा पीडितेवर बलात्कार तसेच अनैर्सगिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे दिली आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिस पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT