kalyan news, superstition, mandir saam tv
मुंबई/पुणे

Miracle or Supersition ? नंदी दूध पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, भाविकांची साई मंदिरात लाेटली माेठी गर्दी

या घटनेची कल्याण शहरात जाेरदार चर्चा सुरु आहे.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : राज्यात देशभरात अनेकदा कधी गणपती बाप्पाच्या मूर्ती तर कधी नंदी दूध पीत असल्याचा प्रकार पाहावयास मिळाला आणि त्यानंतर मंदिरांत उडालेली झुंबड. अर्थातच या सर्व गाेष्टी अंधश्रद्धेला खतपाणी घालणा-या ठरल्या. असाच एक प्रकार कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली कैलास नगर परिसरातील साई बाबांच्या मंदिरात घडला. तेथील नंदी दूध आणि पाणी सेवन करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आणि नागरिकांची तेथे झुंबड उडाली.  (Maharashtra News)

कल्याण शहरातील खडेगोलवली येथील कैलास नगर साई शक्ती कॉलनीतील साई मंदिरात स्थापन केलेल्या नंदीची मूर्ती दूध पीत असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर काय प्रकार आहे आणि मूर्तीला पाणी व दूध पाजण्यासाठी भक्तांची गर्दी झाली.

काही भाविकांनी (devotees) वाट्या, ग्लास इत्यादींमध्ये दूध आणले हाेते. ते मंदिरात जाऊन नंदीचे दर्शन घेत हाेते. हा प्रकार सायंकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दरम्यान श्रद्धा अथवा अंधश्रद्धेतून सुरु असलेल्या या प्रकाराची कल्याण (kalyan) शहरात गेले दाेन दिवस जाेरदार चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Ulhasnagar : उल्हासनगर पोलिसांची मोठी कारवाई! देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त ; आरोपीचं उत्तर प्रदेश कनेक्शन

Kurkure Momos Recipe: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल कुरकुरे मोमोज कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

SCROLL FOR NEXT