Mira Road Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News: हॉटेलमध्ये स्पेशल खोली बुक करून जुगार खेळणाऱ्या 11 जणांना अटक

मिरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मुंबई - मिरा रोडच्या एका बड्या हॉटेल मध्ये खोली बुक करून जुगार खेळला जात असल्याच्या प्रकरणात 11 जणांना पोलिसांनी (Police) सोमवारी रात्री अटक केली आहे. मिरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली आहे.

मिरा रोडच्या सिल्वर पार्क येथील हॉटेल जीसीसी क्लब मध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मिरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला मिळाली होती . त्यानुसार सोमवारी दुपारी साडेचार च्या सुमारास पोलिसांच्या पथकाने हॉटेलमधील खोली मध्ये छापा टाकला. यावेळी खोलीत काही जण जुगार खेळताना आढळून आले.

हे देखील पाहा -

ही खोली ४ ऑगस्ट पासून महेश शिंदे यांनी बुक केली होती. पोलिसांकडून सुरुवातीला शिंदे यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर दबाव वाढल्यानंतर पुन्हा अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिके प्रकरणानंतर उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार महेश नारायण शिंदे हा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातेवाईक असल्याचे सांगत होता. तसेच महेश शिंदे याचे एकनाथ शिंदे सोबत फोटो आहेत. तो शिवसेनेचा शाखाप्रमुख असल्याचे सांगत होता.

मात्र पोलिसांनी महेश शिंदे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातेवाईक नसून फक्त नाम साधर्म्य आहे. महेश शिंदे सह 11 जणांना जुगार खेळतांना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिसीसी क्लब मधून अटक करून जुगार प्रतिबंध कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

कराडप्रेम धनुभाऊंना भोवणार? मुंडेंना पक्षातून काढा, सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update: निर्मला गावित अपघात प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT