Pune Sahkarnagar Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : फक्त बघितलं म्हणून टोळक्याचा अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला; सहकारनगरमधील थरारक घटना

Pune Crime News : याप्रकरणी पोलिसांनी विकी कांबळे (वय २४ वर्ष) या आरोपीला अटक केली आहे. तर अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News :

पुण्यात रागाने बघितल्याच्या कारणावरून एका टोळक्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून जखमी केले. सहकारनगरमधील संभाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विकी कांबळे (वय २४ वर्ष) या आरोपीला अटक केली आहे. तर अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा २० जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होता. त्यावेळी आरोपी रस्त्यात आडवा आल्याने त्याच्याकडे रागाने बघितले. (Latest News)

या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर विकी आणि त्याच्या इतर मित्रांनी फिर्यादीला मारहाण करून कोयत्याने वार केले होते. या प्रकरणाचा अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT