Crime Saam
मुंबई/पुणे

Mumbai Crime: भयंकर! बापाचं राक्षसी कृत्य, पोटच्या २ लेकींवर ६ महिने बलात्कार

Mumbai Crime: मुंबईतील कांदिवली परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या ८ आणि १० वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला आहे.

Bhagyashree Kamble

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतून समोर येत आहे. एका ३५ वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणाची माहिती पीडित मुलींच्या आईला समजताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या कांदिवली परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे वय ८ आणि १० वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. मागील सहा महिन्यांपासून नराधम बाप त्यांच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. नंतर आरोपीने आपल्या मुलींना ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी नराधम बापाने केलेल्या दुष्कृत्याची माहिती कुणालाही सांगितली नाही.

मात्र, याची माहिती आईला समजल्यानंतर तिच्या पायाची वाळू सरकली. तिने थेट समता नगर पोलीस ठाणे गाठले. तसेच नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित आरोपी घटनेच्या ठिकाणाहून फरार झाला आहे. समता नगर पोलीस आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT