navi mumbai crime news Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime : नात्याला काळीमा! 'लग्नानंतर तुला हेच करायचंय...'; पोटच्या मुलीला आईनंच केलं तिच्या बॉयफ्रेंडच्या हवाली

Navi Mumbai crime: अल्पवयीन मुलीला आईने आपल्याच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. 'लग्नानंतर तुला हेच करायचंय, तू हे शिकलं पाहिजे', असं म्हणत आईने मुलीला भयंकर कृत्य करण्यास भाग पाडले.

Bhagyashree Kamble

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयंकर घटना घडलीय. लेक आणि आईच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे तुर्भे हादरलंय. अल्पवयीन मुलीला आईने आपल्याच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. 'लग्नानंतर तुला हेच करायचंय, तू हे शिकलं पाहिजे', असं म्हणत आईने मुलीला भयंकर कृत्य करण्यास भाग पाडले. या घटनेनंतर परिसर हादरले असून, विकृत आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

आई आणि लेकीचं नातं निर्मळ आणि मैत्रीणीप्रमाणे असतं. पण याच नात्याला कलंक लावण्याचं काम एका आईनं केलंय. तुर्भे सेक्टर २२मधील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हादरवणारी घटना घडली आहे. एका आईनं लेकीला आपल्याच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केलीय. 'लग्नानंतर तुला हेच करायचंय, तू हे शिकलं पाहिजे', असं म्हणत आईनं लेकीला विचित्र कृत्य करण्यास भाग पाडलंय.

तसेच याआधी आई आणि प्रियकराने अल्पवयीन मुलीसमोरच अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले होते. या गोष्टी वारंवार घडत होत्या. मात्र, ती कुठेही ही गोष्टी सांगू शकली नाही. कारण कुणालाही काहीही न सांगण्याची धमकी आई आणि प्रियकराने दिली होती. मात्र, विक्षिप्त गोष्टीला त्रासलेल्या मुलीनं एपीएमसी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे ठरवले.

अल्पवयीन मुलीने मित्राच्या मदतीने घटनेला वाचा फोडत पोलीसांना आपबिती सांगितली. पोलिसांनी तातडीने या घटनेचं गांभीर्य जाणून घेत तपास केला. तसेच एपीएमसी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत, विकृत आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या भयंकर प्रकरणानंतर नवी मुंबई हादरली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT