shambhuraj desai saam tv
मुंबई/पुणे

ठरलं! शिंदे गट यंदा दसरा मेळावा घेण्यावर ठाम; शंभुराज देसाईंनी दिली 'ही' माहिती

एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर मोठं भाष्य केलं आहे.

रोहिदास गाडगे

shambhuraj desai News : शिवसेनेच्या दोन्ही गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी (shambhuraj desai) यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर मोठं भाष्य केलं आहे.

शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. मात्र, शिवसेनेत शिंदे गटाच्या उभी पडली आहे. दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. राज्यात दसरा कोणता गट कुठं आणि कोण घेणार यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. शिंदे गटाकडून मुंबईत जिथं प्रशासनानकडून जागा मिळेल, तिथं दसरा मेळावा घेणार असून राज्यातील राजकारणातील घडलेल्या भूमिका सविस्तरपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडतील, असे शंभुराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे.

'दसरा मेळाव्यासाठी परवानगी देणाऱ्या यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी जिथं परवानगी मिळेल,तिकडे दसरा मेळावा घेऊ, अशी संयमाची भूमिका शिंदे गटाकडून घेतली जात आहे.

शंभुराज देसाईंनी चाकण येथील हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर टीका केली. मागच्या काळात वेळ मागून भेट मिळत नसल्याची खंत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये जागेवर निर्णय घेण्याची क्षमता असल्याचे सांगत ठाकरेआणि शिंदे या दोन मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची तुलना उत्पादन शुल्क मंत्री शुंभराजेंनी करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

'आम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली नाही,तर हिंदुत्वाच्या विचारांबरोबर ज्यांनी प्रतारणा केली. ज्यांनी युती म्हणून मत मागून मुख्यमंत्रिपदासाठी जे केलं,त्यांनी स्वत:ला प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे शंभुराज म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

SCROLL FOR NEXT