Ramdas Athawale vs Sanjay Raut
Ramdas Athawale vs Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Ramdas Athawale : संजय राऊतांनी २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं; रामदास आठवलेंचा खोचक टोला

अजय दुधाणे

Ramdas Athawale News : संजय राऊत आमच्या यात्रेत सहभागी होत नाही, ते भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी आणखी २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं, असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. रामदास आठवले हे उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी हा टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज पहाटेच संजय राऊत राहूल गांधींसह यात्रेत सहभागी झाले. यात्रेत सहभागी होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊतांची गळाभेट घेत त्यांचे यात्रेत स्वागत केले. (Maharashtra Political News)

आज दुपारी संजय राऊत पाकव्याप्त काश्मीरमधील शिष्टमंडळ तसेच, शिख समुदायाच्या शिष्टमंडळाशी भेट घेणार आहेत. संजय राऊत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यावर रामदास आठवले यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, राऊत यांनी २०-२५ वर्ष विरोधातच राहावं, असा खोचक टोला रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लगावला आहे.

'धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार'

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिवसेना  उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबत रामदास आठवले यांना विचारलं असता, एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार आणि १३ खासदार आहेत. त्यामुळे 'धनुष्यबाण' हे चिन्ह त्यांनाच मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

Buldhana Crime News: संतापजनक! दुचाकीस्वाराला धडक दिली, जखमीला उपचारासाठी नेतो सांगून दरीत फेकलं; आरोपीला अटक

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT