minister Jitendra Awhad reaction on  ketaki chitale arrest by police
minister Jitendra Awhad reaction on ketaki chitale arrest by police  Saam Tv
मुंबई/पुणे

अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात; जितेंद्र आव्हाड म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शुक्रवारी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. तिच्या आक्षेपार्ह पोस्टवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक राजकीय नेत्यांनी केतकीवर टीका केली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पत्रक काढून केतकीच्या विकृतीचा निषेध केला होता. राष्ट्रवादीसहित समाजातील सर्वच स्तरातून केतकीला अटक करण्याची मागणी पुढे येत होती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. केतकीला ताब्यात घेतल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( Actress Ketaki chitale latest News Update )

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वादळ उठलं होतं. केतकीनं फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांकडून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत होतं. अनेक राजकीय नेत्यांनी केतकीवर जोरदार टीका केली होती. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही केतकी चितळेचा खरपूस समाचार घेतला होता. केतकीच्या पोस्टनंतर राज ठाकरे यांनी पत्रक काढून निषेध नोंदवला होता. त्यात राज ठाकरे म्हणाले होते की 'घाणेरड्या पातळीवर येण साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृत्ती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे', अशा शब्दात त्यांनी केतकीचा निषेध नोंदवला. केतकीच्या पोस्टनंतर तिच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळं केतकीच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातंच केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकीला ताब्यात घेतल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. 'ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन व आभार' या शब्दात आव्हाडांनी केतकीला ताब्यात घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ट्विट करणाऱ्या ट्विटर युजर निखिल भामरेलाही पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निखिल भामरेने मनोज बालगणकर याचं रिट्विट केलं होतं. त्यात 'वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी...बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची' अशा शब्दात त्यानं शरद पवारांना धमकी देणारं ट्विट केलं होतं.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस उज्ज्वल निकम यांच्याबद्दल काय म्हणाले ?

Today's Marathi News Live : राहुल गांधींच्या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनाच नो एन्ट्री

Amit Shah : अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या एकाला अटक

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT