Karuna Munde Legal Action Against Dhananjay Munde saam tv
मुंबई/पुणे

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, करुणा शर्मांना द्यावी लागणार २ लाखांची पोटगी

Karuna Munde Legal Action Against Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौंटुंबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. कोर्टाने दरमहा २ लाख रुपयांची पोडगी करुणा मुंडे यांना देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत.

Priya More

राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. करूणा शर्मा यांचे आरोप वांद्रे कोर्टाने मान्य केले आहेत. करूणा शर्मा यांना महिन्याला खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये करुणा मुंडे यांनी अनेक आरोप केले होते. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांचे सर्व आरोप मान्य केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याचसोबत न्यायालयाने करुणा मुंडे यांना दहमहा २ लाखांची पोटगी द्या असे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'मी न्यायालयाचे आभार मानते. माझ्यासोबत माझी मुलं सुद्धा असल्याने आम्हाला १५ लाख रुपये दरमहा देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने २ लाख रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी १५ लाख रुपयांची पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे.'

तसंच, 'माझा करून मुंडे असा उल्लेख करावा असे कोर्टाने म्हटले आहे. सेटलमेंट करा असे धनंजय मुंडे मला वारंवार बोलले. मी आत्महत्येचा विचार देखील केला होता. पण माझ्या कायम मनात मुलांचा विचार येतो.', असे देखील करुणा मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: 'तू दाखवून दिलं की तू कोणाशीचं लॉयल नाही'; वीकेंड का वारमध्ये स्काउटवर सलमान खान भडकला

Bank Robbery : SBI बँकेत सशस्त्र दरोडा! बडतर्फ PSI निघाला मास्टरमाईंड; जेलमधून रचला कट

Pune : पुण्याजवळचं 'हे' ठिकाण दिसतं चक्क गळ्यातल्या नेकलेससारखं, निसर्गाचा चमत्कार म्हणावा असंच दृश्य

Maharashtra News Live Update: गोकुळ विजयानंतर सतेज पाटील यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी उचलून घेत केलं अभिनंदन

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT