Sehar Shaikh Mumbra corporator Saam TV
मुंबई/पुणे

Sahar Sahikh: सहर शेख म्हणते 'गेम ओव्हर', बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात कुणाचा गेम?

MIM Corporator sahar shaikh: मुंब्रातील एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सहर शेख सध्या गायब असून ती वानखेडे स्टेडियमवर दिसली. तिचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • सहर शेखवर बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप

  • ‘गेम ओव्हर’ व्हिडिओमुळे वाद अधिक तीव्र

  • पोलिस आणि प्रशासनाचा तपास सुरू

  • नगरसेवक पद जाण्याची शक्यता

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख चांगल्याच अडचणीत आलेत. अशातच वानखेडे स्टेडियमवरून सहर शेख यांनी विरोधकांना कसं डिवचलयं. आणि कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी युनूस शेख यांची पुढील रणनीती काय असणार आहे? पाहूयात...

तुने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ कितनी कहानी बनी कितना तमाशा बना. हे गाणं लावून सहर शेखनं प्रसिद्ध केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. बोगस ओबीसी प्रमाणपत्राच्या वादात अडकलेल्या एमआयएमच्या नगरसेविका अखेर वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची मॅच पाहयला गेल्याचं समोर आलं आणि याचं मॅचमध्ये काढलेल्या या व्हिडिओत गेम ओव्हर असं लिहून सहर शेखनं विरोधकांना पुन्हा डिवचलंय.

जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार पुढे आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सहर शेख नॉट रिचेबल होत्या. अजित पवारांच्या पक्षाचे नेते जावेद सिद्दीकी यांनी त्यांच्यावर आणि वडील युनूस शेख यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र घेतल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यामुळे सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात येणार असल्यानं त्या गेल्या काही दिवसात पक्ष कार्यालयाकडेही फिरकल्या नाहीत. त्याच्या प्रभागातील कार्यालयाला टाळं लावल्याचं साम टिव्हीला आढळलं.

दरम्यान विरोधकांनी याप्रकरणात आरोपांची राळ उठवल्यानंतर अखेर युनूस शेख 17 एप्रिलला मुंब्रा पोलीस स्थानकात जबाब नोंदवण्याकरता उपस्थित राहिले. 15 ते 20 मिनट त्यांनी पोलिसांसोबत चर्चा केली. आणि त्यानंतर आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करत करारा जवाब देण्याचा थेट इशारा विरोधकांना दिला.

दुसरीकडे ठाणे तहसीलदार आणि जात पडताळणी विभागाने या प्रकरणी आपला अहवाल तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. तर युनुस शेख यांनीही याप्रकरणात कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबण्याची तयारी सुरु केलीय. त्यामुळे आता अहवालात नेमकं कोणती माहिती समोर येते? सहर शेख यांचं नगरसेवक पद रद्द होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण सध्या तरी प्रभागातून 'नॉट रिचेबल' राहून थेट स्टेडियमवरून विरोधकांना इशारा देणं हा सहर शेख यांचा 'राजकीय स्टंट' असल्याचं चर्चा आहे. मात्र सहर शेख यांनी 'गेम ओव्हर' म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात गेम ओव्हर सहर शेख यांचा होणार की विरोधकांचा हा प्रश्न कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फुटबॉल स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी, वादाला कुठून सुरुवात झाली? बघा VIDEO

भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Mothers Day: उशीर होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आईला हे ७ प्रश्न नक्की विचारा!

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी पेटवला कांदा

Mothers Day Special : तुमच्याही आईला फिरायला आवडतं? मदर्स डेला 'या' ५ बजेट फ्रेंडली ठिकणी नक्की घेऊन जा

SCROLL FOR NEXT