मुंबई/पुणे

Fraud Case: अभिनेत्याची ईमेल आयडी हॅक करुन लाखोंची फसवणूक; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> संजय गडदे

मुंबई : प्रसिद्ध सिनेअभिनेते पूनित इस्सार यांचा ईमेल आयडी हॅक करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. नाटकासाठी बुक केलेल्या थिएटरचे बुकिंग रद्द करून बुकिंगचे 13.76 लाख स्वतःच्या खात्यात वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ओशिवरा पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलं आहे.अभिषेक सुशील कुमार नारायण (34 वर्ष) अस अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची शो मेन थिएटर प्रोडक्शन नावाची कंपनी असून showmantheatreproductions@gmail.com ई-मेलवरून कंपनीचा व्यवहार चालतं असे.फिर्यादी यांनी त्यांचे हिंदी नाटक जय श्रीराम नाटकाचा प्रयोग करण्याकरता एनसीपीए थिएटर यांना 13,76,400/- रूपये देऊन 14 व 15 /01/23 रोजीचा प्रयोग बुक केला. (Latest Marathi News)

22 नोव्हेंबरला एनसीपीए थिएटरला फिर्यादी यांनी यांना ई-मेल आयडी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला मात्र तो ओपन झाला नाही. म्हणून त्यांनी फॉरगॉट पासवर्ड करून ईमेल लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तरी ओपन झाला नाही. तेव्हा त्यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचे त्यांचे लक्षात आले. यावरून ईमेल हॅक झाल्याबाबतची तक्रार फिर्यादी पुनीत इस्सार यांनी स्वतः ओशिवरा पोलीस ठाण्यात दिली.

तक्रारीची दखल घेऊन सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी एनसीपी थिएटरकडे संपर्क साधला असता श्रीराम या हिंदी नाटकाचे बुकिंग रद्द करण्यासाठीचा ईमेल प्राप्त झाला असून बुकिंग साठी देण्यात आलेली रक्कम ICICI बँकेचे खाते क्रमांक 041201002181 या खात्यात जमा करण्याबाबतचा ई-मेल प्राप्त झाल्याचे थिएटर व्यवस्थापनाकडून पोलिसांना सांगण्यात आले, यामुळे फिर्यादी यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर थिएटर व्यवस्थापनाला फिर्यादी यांचे ई-मेल हॅक झाल्याचे कळवून थिएटर बुकिंग रद्द करू नका व पैशाचा कोणताही व्यवहार करू नका असे सांगून फिर्यादी यांची 13,76,400/- रूपयांची होणारी फसवणूक होण्यापासून रोखली.

यानंतर सायबर पोलिसांनी आयसीआयसीआय बँकेतील त्या खात्याची संबंधित असलेला मोबाईल नंबर उपलब्ध करून त्यावरून लोकेशन ट्रॅक करून आरोपी मड मालवणी येथे असल्याचे शोधून काढले. सायबर पोलिसांच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याची अंग झाडाझडती घेतली असता त्याच्याजवलील गुन्ह्यात वापरलेला Vivo कंपनीचा मोबाईल ताब्यात घेत आरोपीला या गुन्हयाप्रकरणी अटक करण्यात आली असून न्यायालयाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री का झाले? संजय राऊत यांनी सांगितलं नेमकं कारण

Viral Video: धावती ट्रेन पकडताना तोल गेला, पाय घसरले अन्... घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस,अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद

Pimpri Chinchwad Corporation : ११ ठेकेदार वर्षभरासाठी ब्लॅक लिस्टेड; निकृष्ट कामांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

Ayushman Bharat Yojana : तब्बल ५ लाखापर्यंत मोफत उपचार; पण अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर!

SCROLL FOR NEXT