म्हाडाचा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची माहिती  अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

म्हाडाचा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची माहिती

हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाच्या व इतर परीक्षा काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता जानेवारीमध्ये होणार आहेत. आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याच संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अधिक माहिती दिली आहे.

हे देखील पहा -

ते म्हणले, यामागचे कारणही तसेच आहे .ज्या जीए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख व दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांनाअटक केली आहे. हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता.अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर लष्कर भरतीचाही पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे . यामागे क्लास चालवणारे मोठ्या प्रमाणावर असतात असा संशय पुणे पोलिसांना होता आणि त्याच आधारे म्हाडा परीक्षाच्या पेपरफुटीचे बिंग फुटले गेले असे देखील अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: आजचा दिवस ठरवेल तुमचं नशीब! या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर; सोमवारचे खास राशीभविष्य

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

SCROLL FOR NEXT