Mhada Lottery 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Lottery 2024: मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्या म्हाडाची लॉटरी होणार जाहीर, कोणाला करता येईल अर्ज, किती आहेत घरांची किंमत?

Mumbai Mhada Lottery 2024: म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपलीय. २ हजार ३० घरांसाठी उद्यापासून दुपारी 12 वाजेपासून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे मुंबईत घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणारेय कुठे कसा अर्ज करायचा समजून घ्या...

Tanmay Tillu

मुंबईत म्हणजेच मायानगरीत डोक्यावर एक भरभक्कम छत असावं एवढंच स्वप्न इथला नोकरवर्ग पाहात असतो. मात्र हेच स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी म्हाडानं उपलब्ध करून दिलीय. म्हाडानं मुंबईतील विविध उत्पन्न गटातील 2 हजार, 30 सदनिकांची मोठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. त्यासाठी 9 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मुंबईतल्या कोणत्या भागात किती म्हाडाची घरं आहेत ते जाणून घेऊ. तसेच त्यांची किंमत किती असेल हेही जाणून घेऊ...

मुंबईतील कोणत्या भागात किती घरं?

  • पहाडी गोरेगाव,

  • अँटॉप हिल-वडाळा,

  • कोपरी,

  • पवई,

  • कन्नमवार नगर-विक्रोळी,

  • शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड

कोणत्या गटासाठी किती घरं?

  • म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी लॉटरी

  • अत्यल्प उत्पन्न गट 359 घरं

  • अल्प उत्पन्न गट 627 घरं

  • मध्यम उत्पन्न गट 768 घरं

  • उच्च उत्पन्न गट 276 घरं

म्हाडाच्या अर्जाची किंमत ?

अर्ज शुल्क ₹ 500/- + जीएसटी @ 18% ₹90/- एकूण ₹ 590/- अर्ज शुल्क विना परतावा

किती असेल घरांच्या किंमती?

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्लूएस) गटातील घरांची किंमत 30 लाखांपासून सुरु होईल. उच्च उत्पन्न (HIG) गटातील घरांची किंमत एक कोटींपेक्षा जास्त असू शकते. यामध्ये 3 बीएचके अपार्टमेंटसाठी किंमत सर्वाधिक असू शकते.

दरम्यान, सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडा कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमत नाही. त्यामुळे तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणत्याही अशा भूलथापांना बळी पडू नका..अर्ज करा आणि मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT