MHADA Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery: खुशखबर! म्हाडाच्या ८००० घरांसाठी लॉटरी निघणार; हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार

MHADA Lottery for 8000 Houses: म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या महिन्याल ८००० पेक्षा जास्त घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे.

Siddhi Hande

स्वतः चे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

८००० पेक्षा जास्त घरांसाठी लॉटरी काढणार

म्हाडा कोकण मंडळाकडून लॉटरी काढणार

घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु सध्याच्या महागाईमुळे घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळेच तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करु शकतात. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच ८००० घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी निघणार आहे. यामध्ये मागच्या लॉटरीत विक्री न झालेल्या घरांचा समावेश आहे.

८००० पेक्षा जास्त घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery for 8000 Houses)

मागच्या लॉटरीत शिरढोण आणि खोणी येथील ८००० घरे विकली गेली नव्हती. त्यांचाही या लॉटरीत समावेश केला आहे. त्यामुळे या लॉटरीला नागरिक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे या वर्षी तुम्हाला हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी आहे.

म्हाडाकडून दरवर्षी लॉटरी काढली जाते. कोकण मंडळाकडून या महिन्यात जाहिरात काढली जाणार आहे. त्यासाठी घरांची माहिती गोळा केली जात आहे. नव्याने उभारलेली घरे आणि खासगी विकासकांकडून २० टक्क्यांतर्गत मिळणाऱ्या घरांची विक्री झालेली नाही. त्यांचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या ठिकाणी घरे उपलब्ध

२०२५ मधील लॉटरीत शिरढोणमधील ५,३२० घरे तर खोणी येथील २७४४ घरे विकली गेली नाही. या घरांचा समावेश केला जाणार आहे. आता या वर्षी तरी ही घरे विकली जाणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या लॉटरीत जास्तीत जास्त घरे असावी म्हणून खासगी विकासकांकडून घरांची माहिती मिळवली जात आहे. तसेच इतर प्रकल्पांची माहिती घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य सरकारने माहितीच्या अधिकारात बदल

ठाकरेसेनेचा व्हीप फुटीर खासदारांनी झुगारला, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

Friday Horoscope: अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणं टाळा; वाचा आजचं राशीभविष्य

Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं ३६ व्या वर्षी निधन; पोटाच्या कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT