मुंबई/पुणे

म्हाडाकडून अतिक्रमणावर कारवाई झाली नाही, तक्रारदार भडकला; वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात घातला गोंधळ

mhada news : म्हाडाकडून अतिक्रमणावर कारवाई न झाल्याने तक्रारदार संतापला. त्यानंतर त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात गोंधळ घातला.

Saam Tv

म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात गोंधळ

तक्रारदार संदीप वैद्य यांनी घातला गोंधळ

सुरक्षा रक्षकांकडून समजवण्याचा प्रयत्न

संजय गडदे, साम टीव्ही

म्हाडा जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने तक्रारदाराने म्हाडा सीईओ मिलिंद बोरीकर यांच्या दालनात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी (पूर्व) येथील सर्वोदय नगर, आर.जी. प्लॉट क्रमांक १५६ येथील कथित अतिक्रमण प्रकरणात म्हाडाने नोटीस बजावूनही प्रत्यक्ष कारवाई होत नव्हती. यामुळे तक्रारदार संदीप वैद्य यांनी म्हाडा मुंबई मंडळाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांच्या दालनात गोंधळ घातल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण निष्कासन विभागाकडून कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप करत संदीप वैद्य यांनी केला. त्यानंतर थेट सीईओंच्या दालनात जाऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना दालनाबाहेर काढले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

मेघवाडी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या या जागेबाबत जी.बी. पंत फाउंडेशन आणि विश्ववर्धिनी शिक्षण संस्था यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाली होती. त्यानंतर म्हाडाने नोटीस जारी केली होती. तसेच जागेची पाहणी करून काही अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आलंय.म्हाडाने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत कारवाईचा इशारा देत अनधिकृत बांधकाम ४८ तासांत हटवण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रत्यक्षात कारवाई न झाल्याने तक्रारदार आक्रमक झाल्याचे समजतंय. या प्रकरणात पुढे म्हाडा प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित संस्थांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते याकडे लक्ष लागलंय.

तक्रारदाराचा आरोप काय?

म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पूर्वी म्हाडाला महापालिका किंवा इतर यंत्रणावर अवलंबून राहावे लागतंय असे यासाठी पाच कोटी रुपये खर्च करून म्हाडाकडून अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात आलाय. या विभागात संदीप कळंबे नावाच्या म्हाडाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला जबाबदारी दिली होती.

म्हाडा सीईओ यांच्याकडून अतिक्रमण निष्कासनाची ऑर्डर निघाल्यानंतर देखील कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय. म्हाडाच्या निष्कासन विभागाकडून अनेक अतिक्रमणांवर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे म्हाडाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे देखील वैद यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरारमध्ये धावत्या गाडीला लागली आग

५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

SCROLL FOR NEXT