kalyan  Saam tv
मुंबई/पुणे

ठाणे, कल्याणमधून मुंबईला काही मिनिटांत पोहोचता येणार; मेट्रो १२ चा विस्तार होणार;कसा असेल मार्ग?

kalyan news : ठाणे, कल्याणमधून मुंबईला काही मिनिटांत पोहोचता येणार आहे. मेट्रो १२ चा विस्तार होणार असल्याने मुंबईला जाणे सोपे होईल.

Saam Tv

मेट्रो १२ चा विस्तार होणार आहे

मेट्रो १८.४ किमी मार्गाची असून काम प्रगतीपथावर.

मेट्रो १४ आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाशी इंटीग्रेशन करणार

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

मेट्रो-१२ बाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. मेट्रो १२ कल्याण-डोंबिवलीला तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडला जाणार आहे. कल्याण शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी करण्यात येणार असल्याचे समोर आलंय. कल्याण शीळफाटा वरून ही मेट्रो दहीसर मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल.

एमएमआरडीएने कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली आहे. मेट्रो १२ हा मार्ग दोन भागात विभागली जाणार आहे. तसेत या मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्यात येणार आहे. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरेल. भविष्यात मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर ) सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी सोपे होईल.

कशी असेल ही मेट्रो १२ अ मार्गिका?

मेट्रो लाईन कल्याण–मानपाडा–कटाई नाका–कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो खुतारी गावाजवळ एकत्रित होईल. त्यानंतर तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूतपर्यंत पोहोचेल. कटाई नाका ते कल्याण फाटादरम्यान मेट्रो १४ - बरोबर कॉमन ट्रॅक आणि स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे.

निळजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे–बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणी होईल. या मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर असून सध्या १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे.

मेट्रो १२ अ ची स्थानके

प्रमुख स्थानके कोणती?

मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT