Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात महिलेसोबत अघोरी कृत्य; पती, सासू-सासऱ्यांसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Dnyaneshwar Choutmal

पुणे : महिला दिनाच्या दिवशी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका महिलेसोबत अघोरी प्रकार घडल्याची बाब उघडकीस आली आहे. मासिक पाळी सुरू असताना एका महिलेशी अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News)

ऑगस्ट २०२२ मधील हा प्रकार असून या संदर्भात एका २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कथले अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. (Latest News Update)

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहानंतर ही महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. २६ जून २०१९ पासून तिचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता.

मासिक पाळीदरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले असा आरोप महिलेने केला आहे. सर्व प्रकरण बीडमध्ये घडलं असल्याने विश्रांतवाडी पोलिसांकडून बीड पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT