Mega Block Saam Digital
मुंबई/पुणे

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Sandeep Gawade

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. नेमका मेगाब्लॉक कुठून कोणत्या मार्गावर असणार आहे? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असणार आहे, याचा आढावा घेणार आहोत. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करता येणार आहे.

सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबेल आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल आणि गंतव्यस्थानावर १५ मिनिटांनी पोहोचेल.

डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.३९ वाजता सुटेल.

अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.४४ वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०.४५ ते ५.१३ वाजेपर्यंत बंद राहतील.

डाउन हार्बर मार्ग

ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल

गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ०४.५१ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.५६ वाजता वांद्रेसाठी सुटेल.

अप हार्बर मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९.४० वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.२८ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ०४.५८ वाजता सुटेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

SCROLL FOR NEXT