Mega Block Saam Digital
मुंबई/पुणे

Mega Block : ६३ तासांच्या ब्लॉकपूर्वीच प्रवाशांचे हाल; लोकल विलंबाचा फटका

Mumbai Local Mega Block : ठाणे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच- सहाची रुंदी वाढण्यासाठी ६३ तासाच्या आणि सीएसएमटी स्थानकात दहा- अकरा प्लँटफॉर्मच्या विस्तार करण्याकरिता ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sandeep Gawade

ठाणे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच- सहाची रुंदी वाढण्यासाठी ६३ तासाच्या आणि सीएसएमटी स्थानकात दहा- अकरा प्लँटफॉर्मच्या विस्तार करण्याकरिता ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परंतु, ब्लॉक सुरु होण्यापूर्वी दिवसभर लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० -११ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल ३६ तासांचा मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. या ब्लॉक येत्या १ आणि २ जून २०२४ रोजी असणार आहे. तर, ठाणे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदी करण्यासाठी शुक्रवारी मध्य रात्री १२.३० ते रविवारी २ जून दुपारी ३.३० वाजेपर्यंत असे ६३ तासांचा ब्लॉकची मध्य रेल्वेने घोषणा केली.

या दोन्हो ब्लॉकमुळे रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांची असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि खासगी आस्थापनांना केले आहे. परंतु,ब्लॉक पूर्वी गुरुवारी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

लोकल गर्दीचा सामना

गुरुवारी सकाळीपासून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या आणि जलद लोकल फेऱ्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे, तसेच लोकल विलंबाने असल्याने कल्याण, ठाणे, घाटकोपर, कुर्ला आणि दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली आहे. ठाणे स्थानकांवर आणि सीएसएमटीवर मध्य रेल्वेकडून ब्लॉकची तयारी सुरु असल्याने लोकल सेवांच्या गतीवर परिणाम पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT