वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या ! SaamTvnews
मुंबई/पुणे

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या !

ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- सुशांत सावंत

नाशिक : ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या (Medical Students) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा (Exam) ह्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत.

हे देखील पहा :

या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. राज्यात ओमायक्रोन विषाणूचा (Omicron Variant) प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी (Student) यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. विरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळा! पावसाअभावी हातची पिकं जाणार; बळीराजाची स्थिती बिकट

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

SCROLL FOR NEXT