Yashwant Jadhav  SaamTv
मुंबई/पुणे

Yashwant Jadhav: यशवंत जाधवांच्या अडचणीत वाढ, MCA कडून जाधवांशी संबधित कंपन्यांची झाडाझडती सुरु - सूत्र

Yashwant Jadhav: यशवंत जाधवांच्या अडचणीत वाढ, MCA कडून जाधवांशी संबधित कंपन्यांची झाडाझडती सुरु

सुरज सावंत

मुंबई: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, आयकर विभागानंतर यशवंत जाधव हे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय म्हणजेच MCA च्या रडारवर आले आहेत (MCA inspected companies related to Shivsena Leader Yashwant Jadhav).

आयकर विभागाच्या कारवाईनंतर आता MCA ने यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याशी संबधित असलेल्या कंपन्यांचा झाडाझडती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ज्या शेल्ड कंपन्यांच्या मदतीने जाधव यांनी पदेशात पैसे पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या ही कंपन्या MCA च्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

आयकर विभागाची यशवंत जाधवांच्या घरी धाड, सलग तीन दिवस छापेमारी

शुक्रवारी 25 मार्चला सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यानंतर सलग तीन दिवस आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी तळ ठोकू छापेमारी केली.

यशवंत जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

यशवंत जाधव यांच्यावरील आरोप काय?

यशवंत जाधवांवर 15 कोटी घोटाळ्याचा आरोप आहे. हे 15 कोटी रूपये यूएईला हलवल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT