Suicide Case Mumbai x
मुंबई/पुणे

Mumbai News : जेजे रुग्णालयातील MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह

Suicide Case Mumbai: मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज-जेजे हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये मध्ये २२ वर्षीय विद्यार्थी मृत अवस्थेत आढळला. हा विद्यार्थी एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात होता.

Yash Shirke

मुंबईतील गँट मेडिकल कॉलेज आणि जेजे हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृतदेह कॉलेज हॉस्टेलमध्ये आढळला. या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या खोलीत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हॉस्टेलमध्ये अशी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जेजे हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये रविवारी (८ जून) रात्री उशिरा एका २२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. या विद्यार्थ्याचे नाव रोहन प्रजापती असे आहे. हॉस्टेलमध्ये एका रुममेटला रोहन मृतावस्थेत आढळला. या रुममेटने हॉस्टेलच्या वॉर्डनला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वॉर्डनने पोलिसांना संपर्क केला.

पोलिसांनी रोहनला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जेजे मार्ग पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूचा अहवाल दाखल केला आहे. रोहनने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. रोहनचा मृत्यू का आणि कसा झाला याचा शोध जेजे मार्ग पोलीस घेत आहेत.

'आम्ही रोहनचे सहकारी, हॉस्टेलमधील विद्यार्थी, त्याचे पालक, जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. पीडित विद्यार्थी हा एमबीबीएसच्या अभ्यासाबद्दल आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंतेत होता', अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितली आहे. रोहनचे आईवडील आणि भाऊ अंधेरीमधील चांदिवली या भागात राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

Bin Lagnachi Goshta: जुन्या नात्यांची नवी इनींग; निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची 'बिन लग्नाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

Shocking News : दहावीच्या विद्यार्थिनीने शाळेतच आयुष्य संपवलं, चौथ्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT