sadichha sane  saamtv
मुंबई/पुणे

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने मागील 21 दिवसांपासून बेपत्ता !

सदिच्छा साने मागील 21 दिवसांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात अजूनही पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे सदिच्छाचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- रुपेश पाटील

पालघर : डॉक्टरकीचे शिक्षण घेणारी सदिच्छा साने (sadiccha sane) मागील 21 दिवसांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात अजूनही पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे सदिच्छाचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवून सदिच्छा चा शोध घ्यावा अशी आर्त हाक सध्या साने कुटुंबीय देत आहेत. सदिच्छा मनीष साने ही MBBS शिकणारी तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली असता एकाएकी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा :

सदिच्छा साने ही 22 वर्षीय तरुणी बोईसर मधील खोदाराम बाग येथे राहत असून मुंबईतील जे जे कॉलेजला प्रिलीयम परीक्षेसाठी जाण्यास ती 29 नोव्हेंबर रोजी घरातून सकाळी 10 वाजेच्या सुमारास निघाली. संध्याकाळ होऊनही सदिच्छा घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांकडुन तिची शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र, दुपारच्या दोन वाजता सुरू होणाऱ्या प्रिलीयम च्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नसून तिचा अचानक फोन बंद येत असल्याची माहिती कुटुंबियांना तिच्या मैत्रिणींकडून देण्यात आली.

त्यानंतर मात्र साने कुटुंबाच्या पायाखालील जमीन सरकली. शाळेच्या शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सदिच्छा नेहमीच टॉपर राहिली असून तिला मिळणाऱ्या स्कॉलरशिप आणि बक्षीस यांच्यातच तीचा शिक्षणाचा खर्च भागत असून सदिच्छा नेहमीच कुटुंबाचा आधार राहिली आहे. मात्र, कुटुंबाचा आधारच मागील 21 दिवसांपासून बेपत्ता असल्याने साने कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत.

सदिच्छा च शेवटचं लोकेशन हे बांद्रा बँडस्टँड येथे दाखवत असून तिचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी योग्य दखल घेऊन सदिच्छा चा शोध घ्यावा अशी मागणी सदिच्छाच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. सदिच्छा चा शेवटचा लोकेशन हे बँडस्टँड येथील असून एका लाईफ गार्डचा सेल्फी सदिच्छा सोबत दिसून येतोय. मात्र, त्यानंतर सदिच्छा कुठे गेली याचा शोध अजूनही पोलिसांना घेता आलेला नाही. \

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT