Minor Girl molested saam tv
मुंबई/पुणे

ताप आल्याने अल्पवयीन मुलगी गेली क्लिनिकमध्ये, MBBS डॉक्टरने केले अश्लील चाळे, त्यानंतर...

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीसोबत एका डॉक्टरने अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नालासोपाऱ्यातील (Nalasopara) तुलिंज परिसरात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका नराधम डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor girl molestation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचार करणारा डॉक्टरच नराधम निघाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलगी ताप आल्याने उपचारासाठी आर.व्ही. सिंग क्लिनिक मध्ये गेली होती. त्यावेळी एमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor) आर. व्ही. सिंगने त्या मुलीसोबत अश्लील वागणूक करत अत्याचार केला. याप्रकरणी तुलिंज पोलिसांनी (Police) पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी सिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्या एका एमबीबीएस डॉक्टरने उपाचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नालासोपाऱ्यात डॉ. आर. व्ही. सिंगचे क्लिनिक आहे. ताप आल्याने उपचार करण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी या क्लिनिक मध्ये आली.

त्यानंतर नराधम डॉक्टरने तिच्यासोबत अश्लील वर्तणूक करुन अत्याचार केला. पीडित मुलीने तुलिंज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर सदर आरोपी विरोधात तुलिंज पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update: ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर विजयी

Kids Sleeping Tips : लहान मुलांना रात्री लवकर कसे झोपवावे? जाणून घ्या टिप्स

Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेवर बविआचा झेंडा फडकला, कोणता उमेदवार कोणत्या वॉर्डमधून विजयी? वाचा लिस्ट

Open Pallu Saree Draping Tips : हातावर सोडलेला मोकळा पदर 'असा' करा स्टाइल, लग्न-समारंभात सर्वजण तुमच्याच फॅशनचे करतील कौतुक

Rupali Thombre: 'तुमच्या बापाची मक्तेदारी नाही! आधी मतमोजणी केंद्राच्या जाळीवर चढल्या नंतर पोलिसांवर भडकल्या, रुपाली ठोंबरे पाटलांचा पुण्यात राडा

SCROLL FOR NEXT