"महापालिकेमधील अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव का रखडला; महापौरांनी खुलासा करावा" Saam Tv
मुंबई/पुणे

"महापालिकेमधील अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव का रखडला; महापौरांनी खुलासा करावा"

अभियंत्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा कोणताही अधिकार सत्ताधारी पक्षाला नसून जर ते या अभियंत्यांना कोविड योध्दा समजत असतील तर ते येत्या तीन दिवसात हा प्रस्ताव मंजूर करावा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई महापालिकेमधील स्थापत्य समितीच्या बैठकीत विविध संवर्गातील 105 सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा आणि विविध संवर्गातील 27 कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मागील आठवड्यात मंजूर करण्यात आला त्यानंतर सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी महापालिका सभागृहासमोर तातडीचे कामकाज म्हणून मांडण्यात आला होता. परंतु आजतागायत दोनवेळा महापालिका सभागृह बोलावून ते रद्द करण्यात आले. Mayor should explain why the proposal for promotion of engineers in the corporation was stalled

दरम्यान मागील काही दिवसांमध्ये महापालिका सभागृहासमोर तातडीचे कामकाज म्हणून ठराव मांडण्यात आला होता. परंतु आजपर्यंत दोनवेळा महापालिका सभागृह बोलावून ते रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रस्तावProposal मंजूर approved न होण्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहाराची असण्याची शक्यता वर्तवली जात असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते मिळून अभियंत्यांनाEngineers त्यांच्या हक्काच्या बढती तथा पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार अमीत साटमMLA Amit Satam यांनी केला आहे.

कोविड काळातCOVID या सर्व अभियंत्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम केले आहे. कोविड सेंटर्सची उभारणी तसेच कोविडच्या इतर उपाययोजनांची अंमलबजावणी हे अभियंते ग्राऊंडवरुन लेवलवरुन काम करत होते. यावेळी अनेक अभियंत्यांना जीव देखील गमवावे लागले आहेत. शिरीष दीक्षित, अशोक खैरनार आदी अभियंते अधिकारी यांचे जीव गेले आहेत.

आज त्यांनीच केलेल्या कामांमुळे सत्ताधारी पक्ष बक्षीस, आणि मेडल तथा पुरस्कार मिळवत आहेत. मुंबईत कोरोना नियंत्रणात आणलं असं जे काही चित्र निर्माण केलं जातं, ते याच अभियंत्यांनी कोविड सेंटरचीCOVID center उभारणी केल्यामुळे. त्यामुळे या अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचा गौरव करण्याऐवजी त्यांना पदोन्नती तथा बढती पासून त्यांना रोखून एकप्रकारे त्यांना अपमानित केले जात आहे. त्यांना दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे महापालिका सभागृह तातडीने Promptly बोलावून या अभियंत्यांना त्यांचा हक्क दिला जावा. त्यांना त्यांच्या पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा कोणताही अधिकार सत्ताधारी पक्षाला नसून जर ते या अभियंत्यांना कोविड योध्दा Covid warrior समजत असतील तर ते येत्या तीन दिवसात हा प्रस्ताव मंजूर करावा. अन्यथा सत्ताधारी पक्ष या अभियंत्यांना पदोन्नतीपासून डावलत आहेत हे स्पष्ट होईल. त्यामुळे अभियंत्यांच्या होणाऱ्या नुकसानीस आणि यामुळे त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाला सत्ताधारी पक्ष जबाबदार राहतील असा उल्लेखही आमदार साटम यांनी पत्रामध्ये केला आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT