Crime News: मौलानाला केली दगडाने मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Crime News: मौलानाला केली दगडाने मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद

मौलानावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अब्दुल रज्जाक आपल्या हातातील दगडाने मौलानाच्या डोक्यावर कसा हल्ला करतो हे स्पष्टपणे दिसत आहे.

चेतन इंगळे

मुंबई : 5 जानेवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास मीरारोडच्या (Miraroad) नया नगर संकुलातील उमर मशिदीजवळ अब्दुल रज्जाक नावाच्या व्यक्तीने 53 वर्षीय मौलाना शराफत हुसेन अब्दुल खान यांना दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून या हल्ल्याची संपूर्ण घटना घटनास्थळाजवळ असणाऱअया CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी मौलानाला तंवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मौलानांच्या मुलाच्या तक्रारीनंतर नयानगर पोलिसांनी आरोपी अब्दुल रज्जाक याच्याविरुद्ध 307 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

53 वर्षीय मौलानावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अब्दुल रज्जाक आपल्या हातातील दगडाने मौलानाच्या डोक्यावर कसा हल्ला करतो हे स्पष्टपणे दिसत आहे.अब्दुल रज्जाकच्या हल्ल्यानंतर मौलाना जमिनीवर कोसळतो, पण रागाच्या भरात नशेत असलेले आरोपी मौलानावर एकामागून एक दगडाने हल्ला करत होता, पण काही लोक धाडसाने आरोपीला पकडतात आणि घटनास्थळावरून निघून जातात. घटनेनंतर स्थानिक लोकांनी जखमी मौलानाला जवळच्या तन्वर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, जखमी मौलाना हा नया नगरच्या दारुल-उलम अजीजिया मदरसा शिक्षक म्हणून काम करतो.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Stomach Heat Relief Remedies: उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करतील हे 7 घरगुती उपाय, पचनक्रियाही सुधारेल

Nagpur : वडील कामावर, आई घरकामात व्यस्त; खेळताना बादलीत पडली, १ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT