Narendra Patil, Mathadi Kamgar, Mathadi Kamgar Strike
Narendra Patil, Mathadi Kamgar, Mathadi Kamgar Strike saam tv
मुंबई/पुणे

Mathadi Kamgar Strike : अखेर माथाडी कामगारांनी उपसले संपाचे हत्यार; नरेंद्र पाटलांचा सरकारला इशारा

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Narendra Patil News : माथाडी कामगारांच्या (Mathadi Kamgar) विविध प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या एक फेब्रुवारीला राज्यभर कामबंद आंदोलन (Mathadi Kamgar Strike) ठेवण्याचा निर्धार माथाडी कामगारांनी केला आहे. हे आंदाेलन माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्या नेतृत्वाखाली हाेणार आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार यूनियनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारकडे पाठपुरावा करूनही सरकार माथाड्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन (aandolan) करणार आहाेत असे नरेंद्र पाटील यांनी नमूद केले. या आंदोलनामुळे एपीएमसी मार्केट देखील बंद राहणार आहे.

या मागण्यांसाठी आंदाेलन

पुर्नरचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणुक करावी.

सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुर्नरचना करावी.

विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन पुर्नरचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणूका कराव्यात.

माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे.

अनुज्ञाप्तीधारक तोलणार मापाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घ्यावे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT