FDA raid in Pune on dry fruits ahead of Diwali SAAM TV
मुंबई/पुणे

दिवाळीपूर्वी एफडीएची मोठी कारवाई, पुण्यात १,३२९ किलो सुका मेवा आणि खाद्यपदार्थ जप्त

FDA raid in Pune on dry fruits ahead of Diwali : दिवाळीपूर्वी पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई करत १,३२९ किलो सुका मेवा आणि खाद्यपदार्थ जप्त केले आहेत.

Shruti Vilas Kadam

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे.पुणे विभागात एफडीएच्या पथकाने एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तब्बल १ हजार ३२९ किलो वजनाचा संशयास्पद खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

या कारवाईदरम्यान पथकाने ३५८ किलो बदाम, ४९३ किलो काळे मनुके आणि ४७८ किलो डाळीचा साठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा आणि मानांकनांच्या नियमांचे तसेच पॅकिंगवरील योग्य लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण अन्नसाठ्याची बाजारातील अंदाजे किंमत ६ लाख ५८ हजार २७५ रुपये इतकी आहे. सणाच्या काळात मिठाई आणि सुकामेव्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, याच संधीचा फायदा घेऊन काही व्यापारी निकृष्ट किंवा विनापरवाना माल बाजारात विकण्याची शक्यता असते.

ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता एफडीए प्रशासनाने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. नागरिकांनी सण-सुदीच्या काळात कोणतीही खाद्यपदार्थ किंवा सुकामेवा खरेदी करताना पाकिटावर दिलेली एक्सपायरी डेट (मुदत), उत्पादनाची तारीख आणि बॅच क्रमांक आवर्जून तपासून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, भेसळयुक्त किंवा संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास तातडीने एफडीएशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दिवाळीत अशा प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र केल्या जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खात्यात २००० रुपये जमा, लगेच तुमचे नाव तपासा

Maharashtra News Live Update: नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! आता पार्सल थेट घरपोच मिळणार; स्टेशनवर जाण्याची कटकट संपणार

Tea or Coffee After Meals: जेवल्यानंतर चहा पिणे योग्य की कॉफी? जाणून घ्या पचनावर काय होतो परिणाम

Cataract surgery: मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 4 रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग, दृष्टीवर परिणाम; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT