Money fruad  Saam tv
मुंबई/पुणे

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्क नियामक प्राधिकरणावर गंभीर आरोप

professional colleges fraud : व्यावसायिक कोर्सेसमध्ये 10,000 कोटींची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात शुल्कनियामक प्राधिकरणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Vishal Gangurde

राज्यातील 4,000 व्यावसायिक कोर्सेस चालवणाऱ्या महाविद्यालयांकडून दरवर्षी 10,000 कोटींच्या लुटीचा आरोप.

शुल्कनियमक प्राधिकरण (FRA) बोगस शुल्क प्रस्तावांना मंजुरी दिल्याचा आरोप

कर्जत-जामखेड रत्नदीप कॉलेज बंद, विद्यार्थ्यांचे ५ कोटी रुपये परत न झाल्याने संताप व्यक्त

FRA कार्यालयाबाहेर संघटनेचं तीव्र आंदोलन

संजय गडदे, साम टीव्ही

राज्यातील व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील प्रचंड गैरव्यवहार पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यातील सुमारे 4,000 व्यावसायिक कोर्सेस चालवणाऱ्या महाविद्यालयांकडून सरकार आणि विद्यार्थ्यांची दरवर्षी तब्बल 10,000 कोटी रुपयांची आर्थिक लूट केल्याचा गंभीर आरोप मुक्ता शिक्षक संघटना, TAF-NAF संघटनेने केला आहे.

फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी (FRA) कडून बोगस आणि अवाजवी शुल्कवाढ प्रस्तावांना मंजुरी दिली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या निर्णयांचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे पालक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

कर्जत-जामखेड येथील रत्नदीप कॉलेज दोन वर्षांपासून बंद असताना 94 विद्यार्थ्यांचे तब्बल 5 कोटी रुपये अद्याप परत न केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. भवितव्य अंधारात गेल्याने हे विद्यार्थी न्यायासाठी दरदर फिरत आहेत. या अन्यायाविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी शुल्कनियमक प्राधिकरण (FRA) कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले.

“आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे… मुलांचे भविष्य अडकलंय, पण कोणी ऐकून घेणारा नाही,” असा संताप पालकांनी व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांची भेट घेत FRA सचिव अर्जुन चिखले यांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, शेकडो कोटींच्या या घोटाळ्याबाबत कठोर कारवाई होणार का, याकडे राज्यभरातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

व्यावसायिक शिक्षणातील घोटाळ्याबाबत कोणता आरोप करण्यात आलाय?

4,000 महाविद्यालयांकडून दरवर्षी तब्बल 10,000 कोटी रुपयांची लूट होत असल्याचा आरोप मुक्त शिक्षक संघटना आणि TAF-NAF संघटनेने केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

Maharashtra Live News Update: चंद्रकांत पाटील उद्या पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार, कायदा व सुव्यवस्थेच्याबाबत घेणार आढावा

SCROLL FOR NEXT