ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट अ्ॅक्टिव्ह
राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश
एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा राजकीय झटका
ठाण्यातील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलतंय
ठाणे : आगामी निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. ठाणे महापालिकेचा गड राखण्यासाठी शिंदे गटाने बैठकांचा सपाटा लावलाय. त्याचबरोबर शिंदे गटाने महापालिका क्षेत्रात पक्षीय पातळीवर मोर्चे बांधणी सुरु केली आहे. शिंदे गटाने ठाण्यात शरद पवारांना मोठा हादरा दिला आहे. राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गडाला सुरुंग लागला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटाचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम या ठिकाणी पक्षप्रवेश पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील नाराजीमुळे बंडखोरी पाहायला मिळतेय.
ठाण्यातील राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विलास पाटील, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर, ओवळा माजिवडा विधानसभा महिला अध्यक्ष राणी देसाई यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की... भारत आंबे माता की...
राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम खामकर. त्याचबरोबर कांबळे, विलास पाटील, अभिषेक कुसाळकर, सुनील कुऱ्हाडे आणि इतर सर्व मान्यवर शुभांगीताई, विशाल भालेराव, गौतम मोरे, राणी देसाई हे पक्षात आले.
आपल्या लाडक्या बहिणी खूप आहे. सगळ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो.
खरं म्हणजे विक्रम खामकर आणि त्याचे कार्यक्रम सहकारी जेव्हा मला भेटले, तर त्यांच्या ठाण्यामध्ये काम करत असताना या कार्यकर्त्यांना मी जवळून पाहत होतो.
सुनील कुराडे म्हणाला, तसंच हा आमच्या पक्षाचे विरोधात होता. राजकारणाच्या पलीकडे देखील काही गोष्टी असतात. मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे. सगळ्या गोष्टी आहेत. अधिकार आहेत.
विक्रम खामकर आणि त्याच्याबरोबर असलेले अभिषेक आहे. प्रफुल कांबळे आहे. त्याचबरोबर विशाल भालेराव आहेत. सर्व कार्यकर्ते सगळे पदाधिकारी आहे. विलास पाटील आहे, तर सगळे लोक आहेत.
मुख्यमंत्री होतो तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं. आजही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे.
बालेकिल्ल्यात सर्वांनी प्रवेश केल्याने हा बालेकिल्ला अधिक मजबूत होणार आहे.
प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्त्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे उभा असतो. त्यामुळे काळजी करू नका.
तुम्ही काम करा हा पक्ष आपला आहे. मालक आणि नोकर असा पक्ष नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.