Pune Latest Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन; पुण्यातील वाघोली परिसरातील घटना

Pune Crime News: सासरकडील छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पुणे शहरातील वाघोली परिसरात घडली.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Latest Crime News

सासरकडील छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पुणे शहरातील वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर लोणीकंद पोलिसांनी पतीसह सासू तसेच नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रीती संजय शिंदे असं मृत महिलेचं नाव आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये प्रीतीचा विवाह संजय शिंदे याच्याशी झाला होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर संजय आणि प्रीती यांच्यात वाद सुरू झाला. या वादात सासरकडील मंडळींनी सुद्धा उडी घेतली. (Latest Crime News)

त्यांनी प्रीतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. सासरकडील मंडळींकडून होत असलेल्या त्रासाची माहिती प्रीतीने आपल्या वडिलांना दिली होती. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील पतीकडून प्रीतीचा मानसिक छळ सुरुच होता. (Breaking Marathi News)

दरम्यान, त्रास असह्य झाल्याने प्रीतीने वाघोली येथील राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी संजय शिंदे, सासू इंदुमती शिंदे, नणंद प्रतिभा माळोदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माऊलीच्या पालखीचं पुण्याहून सासवडकडे प्रस्थान

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT