Mumbai News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News: आँsss काय सांगता! अजगर, घोरपडी, पाली, सरडे चोरून नेले; मुंबईतील प्रकारानं खळबळ

Mumbai News: सोने -चांदीचे दागिने, पैसे चोरीच्या घटना तुम्ही दररोजच ऐकत असता. मात्र, मुंबईत चक्क एका प्राणी संग्रहालयातून प्राणीच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News

सोने -चांदीचे दागिने, पैसे चोरीच्या घटना तुम्ही दररोजच ऐकत असता. मात्र, मुंबईत चक्क एका प्राणी संग्रहालयातून प्राणीच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे मोठे प्राणी तर सोडाच पाली सरडे पण चोरीला गेले आहेत. त्यामुळे मुंबई सध्या मगर, अजगर, पाली, सरड्यांवरून बरीच चर्चेत आहे.

शिवाजी पार्क येथील मरीन एक्वा झूमधून ६ अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेला आहे. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याची माहिती समोर आली आहे.

मरीन एक्वा झूमधील कथित अनधिकृत बांधकामावरती पालिकेने सोमवारी कारवाई करत बांधकामावर हातोडा चालवला होता. या कारवाईनंतर लगेचच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेले आहेत. दरम्यान प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप प्राणी संग्रहालय प्रशासनाचा होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राणी संग्रहालयाच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावामध्ये मगरीचे पिल्लू सापडल्यानंतर हे प्राणी संग्रहालय चर्चेत आले होते. दरम्यान प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT