Manoj Jarange Patil Saam Tv
मुंबई/पुणे

३ वाजेपर्यंतची मुदत, मनोज जरांगेंना आझाद मैदान सोडावं लागणार; कोर्टात नेमकं काय घडलं?

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस. मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलकांना दुपारी ३ वाजेपर्यंत जागा सोडण्याचा आदेश दिला.

Bhagyashree Kamble

  • मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस.

  • मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलकांना दुपारी ३ वाजेपर्यंत जागा सोडण्याचा आदेश दिला.

  • पोलिसांनीही आंदोलकांना आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली.

  • मनोज जरांगे पाटील यांनी कोर्ट आणि पोलिस नोटिशीनंतरही हटणार नाही असा पवित्रा घेतला.

मराठा आंदोलकांचा आज आंदोलनाचा पाचवा दिवस सुरू आहे. काल कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आणि आज मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीत आंदोलकांना आझाद मैदान सोडण्यास सांगितले आहे.

आज मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेल्या याचिकेविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, कोर्टानं मराठा आंदोलकांना ३ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. ३ वाजेपर्यंत मैदान रिकामं करण्याचा आदेश दिला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ' मराठा आंदोलकांना ताबडतोब निघून जावं लागेल. हे बेकायदेशीर आहे. आज दुपारी ३ वाजेनंतर, कुणीही तिथे बसणार नाही' असं कोर्ट म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण आंदोलनावरील सुनावणीदरम्यान, कोर्टानं पुन्हा एकदा आंदोलकांना स्पष्ट इशारा दिला आहे. आझाद मैदान सोडण्यास सांगितले. कोर्टात एसीजे यांनी मराठा आंदोलकांचे वकील माने - शिंदे यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला. ' उच्च न्यायालयाला वेढा घालता येणार नाही. तुम्ही प्रथम या न्यायालयाचे अधिकारी आहात. ते (मराठा आंदोलक) तिथून निघून गेले आहेत का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एसीजे (न्यायमुर्ती) यांच्या प्रश्नावर माने शिंदे यांनी, 'नाही मिलॉर्ड्स, मनोज जरांगे अजूनही तिथेच आहेत. त्यांनी परवानगी वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. बाकीचे निघून गेले आहेत', असं त्यांनी उत्तर दिलं.

यावर न्यायमुर्ती म्हणाले, 'हे काय आहे? अर्जावर काही आदेश येईल ही अपेक्षा? तिथे कुणीही बसू शकत नाही. ताबडतोब निघून जावे लागेल. हे बेकायदेशीर आहे. आज दुपारी ३ नंतर, कुणीही तिथे बसणार नाही, याची खात्री करा. गरज पडल्यास, आम्ही एखाद्याला पाठवू किंवा आम्ही स्वतः रस्ते आणि घटनास्थळाला भेट देऊन सर्वजण निघून गेले आहेत का ते तपासू', असं न्यायामुर्ती म्हणाले.

कोर्टानं राज्य सरकारलाही झापलं

कोर्टात न्यायमुर्तींनी राज्य सरकारलाही सुनावलं. न्यायमुर्ती म्हणाले,'आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही. सरकार काय करत होते, याबाबतही आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमचे निदर्शक या न्यायालयाच्या न्यायाधीशांना रस्त्यावरून चालत त्यांच्या न्यायालयात पोहोचण्यासाठी आणि कामकाज चालवण्यास कसे भाग पाडू शकतात? तुमचे निदर्शक रस्त्यावर नाचत होते, म्हणून तुम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असे चालण्यास भाग पाडू शकत नाही', असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

आम्हाला सत्ता द्या, दत्तक बाप उद्या यायला घाबरला पाहिजे; नाशिकमधून उद्धव ठाकरे कडाडले

Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

घरातून बाहेर पडताना गोड पदार्थ खाऊन निघा; ५ राशींच्या लोकांना आयुष्यातील सर्वात मोठं यश मिळणार

SCROLL FOR NEXT