Ajit Pawar On Jalna Maratha Andolan saam tv
मुंबई/पुणे

Maratha Andolan: मोठी बातमी! अजित पवार आपल्या आमदारांसह घेणार जालन्यात मराठा आंदोलनकर्त्यांची भेट, सूत्रांची माहिती

Maratha Reservation Protest: मोठी बातमी! अजित पवार आपल्या आमदारांसह घेणार जालन्यात मराठा आंदोलनकर्त्यांची भेट

Satish Kengar

>> रुपाली बडवे

Maratha Reservation Protest:

जालन्यातील घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच आपल्या सगळ्या आमदारांसह आंदोलकांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार गटाची मराठा आरक्षण मिळावी हीच भूमिका असल्याची माहितीव सूत्रांनी दिली आहे. अजित पवार आमदारांसह आजच आंदोलन स्थळी जाऊन भेट घेणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी आजची भेट टाळली असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने अजित पवार शिवसेना आणि भाजपवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आपले २ दिवसांचे नियोजित तीन कार्यक्रम रद्द केल्याने या चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

पुणे, पिंपरी आणि बुलडाणा येथील त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच शासन आपल्या दारी या कार्यक्रमातही अजित पवार गैरहजर होते. यामुळेही अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार आज मुख्यंमत्र्यांसोबत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र अचानक त्यांनी आपला दौरा रद्द केला. यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''अजित पवार यांची तब्येत बरी नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर आहेत, त्यामुळे आता लोक नाराजीच्या चर्चा सुरु होतील. मात्र असं काही नाही. आमच्यात फेविकॉलचा जोड आहे.आमचं सरकार मजबूत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT