Marath resrervation  Saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळात दुही; भुजबळ आणि मराठा नेत्यांमध्ये खडाजंगी?

Maratha Reservation: बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत छगन भुजबळ आणि मराठा नेत्यांसोबत खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर

Mumbai News:

मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण पेटलं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांकडून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, या आरक्षणाच्या मागणीवरून आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत छगन भुजबळ आणि मराठा नेत्यांसोबत खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलकांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मंगळवारी राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यावरून खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध असल्याचे समोर आले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याने ओबीसी समाज आक्रमक होईल, यावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीचा सूर उमटल्याचे बोलले जात आहे.

या आंदोलनामुळे ओबीसी नेत्यांना सरकार सुरक्षा पुरवणार असल्याची चर्चा झाली. तर या कॅबिनेट बैठकीतील चर्चेत छगन भुजबळ यांची मराठा नेत्यांसोबत खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कॅबिनेट बैठकीत चर्चेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर त्याला कायम विरोध राहणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी जाहीर केली आहे. राज्यात मराठा समाजापेक्षा ओबीसी समुहाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे सरकारने ओबीसींना गृहीत धरू नये, अशी सूचना छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT