Manoj Jarange Patil Pune Vidhan Sabha Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarage Patil: मनोज जरांगेंचं मिशन विधानसभा, पुण्यातील सर्व मतदारसंघाचा अहवाल मागवला; कुणाला मिळणार तिकीट?

Manoj Jarange Patil Pune Vidhan Sabha: मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल मागवला आहे. कोणत्या मतदारसंघात किती मतदार आहे, या आढावा जरांगे पाटील घेणार आहेत.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य सरकारने सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अन्यथा सर्व आमदारांना पाडणार अशा इशाराच जरांगे यांनी दिला आहे. यासाठी ते अंतरवाली सराटी येथे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती देखील घेत आहेत.

दुसरीकडे मनोज जरांगेंकडून (Manoj jarange Patil) राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील पुण्यातही आपले उमेदवार उभे करणार आहेत. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा (Pune Vidhan Sabha Election) अहवाल मागवला आहे. कोणत्या मतदारसंघात किती मतदार आहेत आणि मतदारसंघाची काय गणिते आहेत, हे जाणून घेण्यासाठी जरांगे यांनी अहवाल मागवल्याची माहिती आहे. लवकरच अहवालावर अभ्यास करून जरांगे पाटील उमेदवारांची निवड करू शकतात.

पुणे जिल्ह्यात शिवाजी नगर, खडकवासला, कसबा, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती या सर्व मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघातून मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे. नुकतेच पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

११ ऑगस्ट रोजी पुण्यात दाखल झालेल्या या शांतता रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजातील बांधवांनी विधानसभा निवडणुकीत मराठा बांधव उमेदवार देऊ अशी घोषणा केली होती. आता २९ ऑगस्टला मनोज जरांगे उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिर्डीत दाखल

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT