Cm Eknath Shinde On Maratha Reservation Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation : एक-एक मिनिट महत्वाचा!; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत CM शिंदेंनी नेमक्या कोणत्या सूचना केल्या?

Cm Eknath Shinde On Maratha Reservation : एक-एक मिनिट महत्वाचा!; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत CM शिंदेंनी नेमक्या कोणत्या सूचना केल्या?

Satish Kengar

Cm Eknath Shinde On Maratha Reservation :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुद्दत दिली आहे. यानंतर आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच अॅक्शनमध्ये आले आहेत.

जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक एक मिनिट, एक एक तास महत्वाचं असल्याचं सांगत युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांना सूचना देताना म्हणाले आहेत की, ''मराठा आरक्षणासाठी आजपासून युद्धपातळीवर कामाला सुरूवात करा. एक महिना ड्राईव्ह मोडमध्ये काम करा. सरकारने शब्द दिला आहे, तो पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आपल्याला कारणं सांगता येणार नाही. एक एक मिनिट, एक एक तास आपल्याला महत्वाचा आहे. सरकार प्रामाणिक पणे प्रयत्न करत आहे हे लोकांना कळलं पाहिजे.'' (Latest Marathi News)

शिंदे म्हणाले, ''शिंदे समितीच्या कामाचं काटेकोर पालन करा. पडताळणीच्या कामासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा. मराठवाडंयात अवलंब केलेली कार्यपद्धती अन्य विभागांशी शेअर करा. आठवड्यात किती नोंदी तपासल्या किती नोंदी निष्पन्न झाल्या हे एका स्वतंत्र वेबसाईटवर टाका. त्यामुळे कामात पारदर्शकता राहील. लोकांनाही कळेल सरकार काय काय करतेय.''

दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळाने आरक्षण देण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ द्यावी, अशी विनंती त्यांना केली होती. मात्र जरांगे यांनी सरकारला 26 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT