मराठा विरुद्ध ओबीसी अशा आरक्षणाच्या वादामुळे राज्याचं राजकीय तसेच सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीवर विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. याच मुद्द्यावरून मराठा बांधव उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सोमवारी मुंबईतील मातोश्री या निवास्थानी गेले होते.
मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांना भेट दिली नाही. त्यामुळे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. मराठा आंदोलनाचा विरोधकांना निवडणुकीत चांगलाच फायदा झाला असून त्यांचे बंद पडलेले पक्ष आमच्यामुळेच सुरू झाल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) कोणतीही भूमिका न मांडल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. आज मुंबईतील ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानावर मराठा संघटना धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. हीच बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी ठाकरेंच्या मातोश्री निवास्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
मराठा समाजाकडे कानाडोळा केला तरी आम्हालाच मतदान मिळेल, असा यांना भ्रम झाला आहे. पण या भ्रमात राहू नका. तुम्हाला तुमची लायकी दाखवून देऊ, असा इशाराही मराठा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय.
आज मराठा समाजाकडून उद्धव ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढण्याची शक्यता असल्याने खेरवाडी पोलीस ठाण्याकडून मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅरिगेट आणून ठेवण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये म्हणून खेरवाडी पोलीस खबरदारी घेत असल्याचं दिसून येतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.