१०० कोटी वसुली प्रकरण: परमबीर सिंंह यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? Saam Tv
मुंबई/पुणे

१०० कोटी वसुली प्रकरण: परमबीर सिंंह यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन होणार?

त्याच्या विरोधात ३ अजामीन पात्र वारंटही काढण्यात आलं आहे.

सूरज सावंत

मुंबई - महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि मुंबई पोलिसांच्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांच्याविरुद्ध खंडणीच्या आरोपांप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच अनेक गुन्ह्यात परमबीर हे मुख्य आरोपी असून वारंवर बोलावून ही तपास यंत्रणेला ते सामोरे जात नाही आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात ३ अजामीन पात्र वारंटही काढण्यात आलं आहे.

हे देखील पहा -

सूत्रांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी प्रत्येक अधिकाऱ्यावरील विशिष्ट आरोपांचा तपशील असलेला अहवाल डीजीपी कार्यालयातून महाराष्ट्राच्या गृह विभागाला पाठवण्यात आला होता, त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाला एक प्रस्ताव दिला होता की परमबीर सिंग यांच्यासह एकूण 25 अधिकारी, चार डीसीपी दर्जाचे अधिकारी आणि अनेक एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर खंडणीच्या आरोपाखाली पाच एफआयआर दाखल करण्यात यावेत.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, “सिंग आणि अन्य डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नावे खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यात अनेक ठिकाणी आल्याने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे सर्व वरिष्ठ अधिकारी असल्याने हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे जाणार असून, ते अंतिम निर्णय घेणार आहेत. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री रुग्णालयातून परतल्यावर यावर निर्णय होऊ शकतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

Firing : शहरातील प्रसिद्ध बारमध्ये बेछूट गोळीबार; ४ जण जागीच ठार, २० जण जखमी

Viral Video: गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना बायकोनं पकडलं; झिपऱ्या धरून नवऱ्याच्या प्रेयसीला भररस्त्यात लय बेकार चोपलं

SCROLL FOR NEXT