Mumbai Mantralay Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Breaking News : वडापाव विक्रेत्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; इमारतीवरून उडी मारली, जाळीवर पडला

Mumbai Breaking News : मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी घेतली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. अरविंद बंगेरा असं त्या व्यक्तीचं नाव आहे.

सूरज सावंत

Mumbai Mantralaya news :

मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. अरविंद बंगेरा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीची वडापावची गाडी आहे. या व्यक्तीने मंत्रालयातील जाळीवर उडी का घेतली, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात पुन्हा एकदा एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मंत्रालयातील जाळीवर अरविंद बंगेरा नामक व्यक्तीने उडी मारली. अरविंद बंगेरा हे वडापाव विक्रेते आहे. अरविंद बंगरेा हे बोरिवली येथे राहतात. अरविंद बंगेरा यांनी उडी मारल्यानंतर पोलिसांची धावाधाव झाली. बंगेरा यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीची अधिक चौकशी सुरु आहे.

अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांनीही मारल्या होत्या उड्या

दरम्यान, मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आतापर्यंत अनेकांनी उड्या मारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांच्या समितीमधील चार जणांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले होते.

मंत्रालयात सुरक्षा जाळी का?

काही वर्षांपूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. हर्षल रावते असे या तरुणाचे नाव होते. त्यानंतर गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीविषयी बैठक झाली. या बैठकीत मंत्रालयाची सुरक्षा आणि आत्महत्यांचे सत्र रोखण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर पहिल्या मजल्याला समांतर संरक्षक जाळी बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

15 लाखाच्या पगारावर आता 1 रुपया ही टॅक्स नाही, वाचा ही ट्रिक

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...

SCROLL FOR NEXT