मोक्का लागलेल्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केले गजाआड! SaamTvNews
मुंबई/पुणे

मोक्का लागलेल्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केले गजाआड!

मोक्का लागलेल्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंबिवली येथून गजाआड केले आहे. हसनैन सय्यद असे या आरोपीचे नाव आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : मोक्का लागलेल्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंबिवली येथून गजाआड केले आहे. हसनैन सय्यद असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 2 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डोंबिवली (Dombivli) मधील मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांच्या पथकाला या वस्तीत पाच वर्षापासून फरार असलेला आरोपी हसनैन सय्यद हा असल्याची माहिती मिळाली.

हे देखील पहा :

त्यानुसार डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जे.डी.मोरे, वपोनी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने छापा टाकला. या छाप्या दरम्यान हसनैन हा पोलिसांच्या (Police) ताब्यात सापडला. यावेळी पोलिसांसोबत काही नागरिकांची झटापटी झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी हसनैन सैय्यदला पोलिसांच्या गाडीत टाकले आणि त्याला घेऊन थेट मानपाडा पोलिस गाठले. हसनैन सय्यद हा देशात चैन स्नॅचिंगचा मोठा गुन्हेगार (Criminal) मानला जातो. 20 गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्या विरोधात मोक्काही (Mokka) लावण्यात आला आहे. पाच वर्षानंतर हसनैनला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Live Update : निवडणूक चिन्ह कुणाचे? राजकीय पक्षाचे की विधिमंडळपक्षाचे? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT