manoj jarange  Saam tv
मुंबई/पुणे

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, ३० मेपासून उपोषणाला बसणार; सरकारकडे केल्या १३ प्रमुख मागण्या

manoj jarange patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. जरांगे यांनी ३० मेपासून उपोषणाला बसणार असल्याचे घोषित केले आहे.

Saam Tv

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

भाजप नेते प्रसाद पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे गेल्या १३ प्रमुख मागण्या

अक्षय शिंदे, साम टीव्ही

मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी ३० मेपासून उपोषणाला बसणार असल्याचे घोषणा केली हे. जरांगे यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी आज शुक्रवारी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर जरांगे यांच्या मागण्या समजून घेतल्या. या मागणासंदर्भात उपसमतिशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली.

काय आहे जरांगे पाटील यांच्या मागण्या?

1) मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीने ५८ लाख कुणबी नोंदी शोधल्यात. त्या व्यक्तींना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि तात्काळ व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देखील देण्यात यावे.

2) हैदराबाद गॅझेटियरच्या जी.आर. नुसार मराठवाड्‌यातील मराठा समाजाच्या व्यक्तींना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं. त्यानंतर त्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देखील देण्यात यावे. शासनाने व्हॅलिडिटीसाठी कोणत्याही जाचक अटी घालू नयेत. त्यांना प्रमाणपत्र ओबीसी आरक्षणाच्या धर्तीवर देण्यात यावे.

3) सातारा संस्थान गॅझेटियरचा जी.आर. तात्काळ काढण्यात यावेत. सातारा गॅझेटियर/हैदराबाद गॅझेटियर/कोल्हापूर गॅझेटियर/बॉम्बे गॅझेटियर/औंध पुणे गॅझेटियरचा हा जी.आर. काढताना जी.आर. १९९४ च्या जी.आर. च्या नियमावली नुसार काढावा. त्यात हैदराबाद गॅझेटियरचा सुद्धा समावेश/उल्लेख असावा.

4) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी तात्काळ देण्यात यावी. तसेच त्यांना १० लाख रुपये निधी राहिलेल्या कुटुंबियांना देण्यात यावा.

5) राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.

6) मराठा - कुणबी बांधवांच्या प्रश्नांसाठी एक स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय तात्काळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

7) सगे-सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.

8) मा. शिंदे समितीला कामासाठी १ वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी.

9) सारथी संस्थेच्या सर्व योजना पुन्हा सुरु करव्यात. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्याज परतावा देण्यात यावा. तसेच महामंडळाच्या योजना सुरु करण्यात याव्यात.

10) SEBC च्या मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीच्या सर्व सवलती लागू करव्यात.

11) SEBC / EWS मधून विविध विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अधिसंख्या पदे निर्माण करावीत, त्यानंतर तात्काळ नियुक्ती देण्यात यावी.

12) संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी. ही केस सरकारने तात्काळ सुरु करावी.

13) कोपर्डी खटल्यातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अजून एका महिलेला घेतलं ताब्यात

Maharashtra Election: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी, कुठे अन् कधी पार पडणार मतदान? निवडणूक कार्यक्रम जाहीर

Earthquake Video : भूकंपाने जमीन थरथरली; १३ इमारती कोसळल्या, थरारक व्हिडिओ

Hair Care: डोक्यावर पडत चाललेलं टक्कल कमी करुन लांब सिल्की केस हवेत? मग आठवड्यातून १ वेळा लावा हा हेअर मास्क

Heatwave News: उकाड्याचा कहर! जगातील सर्वात उष्ण 20 शहरांमध्ये भारतातील शहरांचा समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT