Manoj Jarange Patil warning to Raosaheb Danve on Maratha reservation  Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: "मराठ्यांनी ठरवलं तर तुला आयुष्यभर...", मनोज जरांगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा

Manoj Jarange vs Raosaheb Danve: आज पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.

Satish Daud

नितीन पाटणकर, साम टीव्ही

Manoj Jarange vs Raosaheb Danve

मराठा समाजाच्या भेटीगाठीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.

मराठ्यांनी ठरवलं तर तुमच्या अंगाला आयुष्यभर गुलाल लागणार नाही, तुम्हाला राजकारणातून घरी बसावं लागेल, मग शेतात जाऊन ऊस तोडण्याची परिस्थिती येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज जंगी सभा पार पडली. या सभेतून त्यांनी हा इशारा दिला आहे. अगदी आठवडाभरापूर्वी भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात मराठा समाजाने लावलेले बॅनर काही लोकांनी फाडले होते. यावेळी जाब विचारणाऱ्या मराठा तरुणांनाही मारहाण करण्यात आली.

सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. ही मारहाण भाजप खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या समर्थकांनी केल्याचा आरोपही अनेकांकडून करण्यात आला. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी देखील दानवे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

आता पोस्टर फाडले तर आम्ही तुमचे कपडे फाडू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर तुझ्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. मग ऊस तोडायलाच शेतात जावं लागेल, असं म्हणत जरांगे यांनी दानवेंवर शाब्दिक हल्लाबोल केला.

मी फक्त तुझे घर कसे आहे ? कुठे आहे हे पाहायला आलो तरी माझ्यासोबत आलेल्या लाखो लोकांच्या पायाच्या धुळीने तुझा बंगला उडून जाईल, असा टोलाही जरांगे यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे? हे सांगताना मनोज जरांगे यांनी अशी काही विधानं केली आहेत ज्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरक्षण आधीच मिळालं असतं, तर ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली नसती, असं जरांगेंनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 14200 रुपयांनी स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT