Manoj Jarange Patil reaction on Gunaratna Sadavarte car vandalized in mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: आम्हाला हलक्यात घेऊ नका, गुणरत्न सदावर्तेंच्या आरोपानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil News: मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी ही तोडफोड केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Satish Daud

Manoj Jarange Patil on Gunaratna Sadavarte

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाड्यांची गुरुवारी तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी ही तोडफोड केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला नेमका कुणी केला माहीत नाही. आमचे आंदोलक असं काही करणार नाही, असं सांगतानाच अशा प्रकारच्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सरकारने मराठा समाजाची मागणी गांभीर्याने घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. हल्ल्याबाबत मला काहीच माहीत नाही. कोण आहेत? काय आहेत? माहीत नाही. मराठा समाज (Maratha Aarakshan) शांततेत आंदोलन करतोय. हजारो गावात आंदोलन करतोय. आताही करत आहे. आमचं आंदोलन चालूच राहणार आहे, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचे आरोप काय?

अलिशान गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले आहेत. शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे काय? असा सवाल करतानाच मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

माझं सरकारला म्हणणं आहे, एकट्या जरांगेंचं ऐकू नका. आमचंही ऐका. जरांगेचे लाड थांबवले नाही तर मीही प्राणांतिक उपोषण करेल. पाणी घेऊन उपोषण होत नाही. सलाईन लावून उपोषण होत नाही, असा टोलाही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

SCROLL FOR NEXT