Pune crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune crime : पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल; शिक्षक पतीला राग अनावर, बिहारी मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढला!

husband killed wife boyfriend : पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर बिहारी मित्राच्या मदतीने शिक्षक पतीचा काटा काढल्याची भयंकर प्रकार समोर आला आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यातून भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीचे आणि बॉयफ्रेंडचे फोटो व्हायरल झाल्याने पतीने त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील बावधनमध्ये ही घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आरोपी राजीवकुमार महतोसह साथीदार धीरजकुमार रमोदसिंगला अटक केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपी राजीवकुमार हा बिहारमध्ये शिक्षक आहे. राजीव कुमार आणि त्याच्या पत्नीचे घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरू आहे. या सर्व तणावातून जात असताना पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत व्हायरल झाले. या फोटोमुळे शिक्षक पतीचा राग अनावर झाला. त्यानंतर शिक्षक राजीवकुमारने प्रवीण कुमार महतोची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पुण्यातील बावधानमध्ये शिक्षक पतीने पत्नीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. राजीव कुमार असे आरोपीच नाव आहे. राजीव कुमार हा मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलहामुळे तणावात होता. पत्नी गेल्या तीन- चार वर्षांपासून सोबत राहत नव्हती. त्यांची घटस्फोसाठी कोर्टात केस सुरू आहे. अशातच पत्नीचे बॉयफ्रेंड प्रवीण कुमार सोबतचे फोटो व्हायरल होत होते. ते फोटो राजीव कुमार याच्यापर्यंत आले होते. आधीच तणावातून जात असलेल्या राजकुमारने प्रवीण कुमारचा काटा काढण्याच ठरवलं.

प्रवीण कुमार हा त्याच्याच भावाच्या पुण्यात असलेल्या नर्सरीत पार्टनर म्हणून काम करत होता. राजीव कुमारने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाला सोबत घेऊन पुणे गाठलं. मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमारच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. हत्या केल्यानंतर शिक्षक असलेल्या राजीव कुमारने पळ काढला होता. परंतु , पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जात असताना त्याला बेड्या ठोकल्यात. राजीव कुमार हा बिहारमध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षक असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT